पैसा

                    


पैसा-पैसा म्हणू नका
पैशापेक्षा मोठा घातकी कोणी नाही
कधी लावतो वाईट मार्गाला
तर लावतो सरळ मार्गाला

            पैसा वाटे तुम्हाला उच्च
            परंतु हाच सर्वात नीच
            कोणी मागतो पैसा-पैसा
            तर कोणी मागतो जीवन

पैसा लावतो कोणाला पापाचा मार्ग
तर कोणाला पुण्याचा मार्ग
पैशामुळे करतो कोणी हत्या
तर कोणी करतो दुबळ्यांना दान

      असा हा पैशाचा खेळ
      कधीच कोणाला न कळणारा


EmoticonEmoticon