बापू बिरू वाटेगावकर


बापू बिरू वाटेगावकर (आप्पा)" म्हणजे कृष्णाकाठचे
एक "अतिभयानक भयपर्व", "बोरगावाचा ढाण्या वाघ",
"दीन-दलितांचा कैवारी" , "सर्वसामान्य लोकांचा आधारवड" अशा अनेक विशेषणांनी बापूंची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे.
सांगली जिल्हयाच्या वाळवा तालुक्यातील बहे-
बोरगाव हे बापूंचे गाव. याच कृष्णाकाठावर
काही दशकापूर्वी रचला गेला एक रक्तरंजित
क्रांतीचा इतिहास. गावातील गावगुंड गोर-गरीब
जनतेवर अन्याय-अत्याचार करत
त्यांना गुलामाची वागणूक देत होते.
गरिबांच्या लेकी-सुना त्यांच्या वासनेच्या बळी पडत
होत्या. प्रचंड दहशत, टवाळखोर
गुंडांची टोळी याच्या बळावर
त्या गावगुंडानी थैमान घातले होते. जाब
विचारणारा कोणी नव्हता. दाद मागायचे धाडस
कोणात नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्याच
गावच्या तांबड्या मातीत कुस्ती खेळणारा एक
पैलवान असणारा धनगराचा पोर पुढे
सरसावला तो म्हणजे ''बापू बिरू वाटेगावकर''...!
ती तांबडी माती बंड शिकवते, त्यात अंग
घुसळणारयाला 'लढ' म्हणावे लागत नाही.
तो पैलवान हातात कुऱ्हाड बंदूक घेवून
एकटा उठला आणि त्याने क्रांतीचा एल्गार केला.
गावगुंडांची मुंडकी कुऱ्हाडीने उडवून हा बहादर
फरारी झाला. सह्याद्रीच्या कडेकपारीत
लपून त्यांनी आपल्यासारखी माणसे
जमवली आणि अन्यायाविरुध्द लढा सुरु केला.
कृष्णेच्या काठावरील गुंडगिरी, सावकारी मोडीत
काढली. पोलिसांनी सातारा-सांगली-
ोल्हापूरसह सगळा .महाराष्ट्र पिंजून काढला, पण हे
वारे कोणाच्याच हाती लागले नाही. "बापू बिरू"
या नावाचं वादळ संपूर्ण महाराष्ट्रात घुमू लागले.
सरकारने त्यांच्या अटकेसाठी माहिती देणारयास
मोठे इनाम जाहीर केले पण सर्व-सामान्य जनतेचे बापूंवर
अफाट प्रेम होते त्याच आधारावर जवळजवळ ३० वर्षे
पोलिसांना गुंगारा देत त्यांनी आपला लढा सुरू
ठेवला. त्यांनी हुंडा पद्धतीला विरोध करत कित्येक
लेकी-सुनांचे नांदणे बसवले, कित्येकांची कर्जे मुक्त केली,
कित्येकांच्या जमिनी सोडवून
दिल्या यासाठी वेळप्रसंगी त्यांनी बंदूकही चालविली.
अगदी त्यांच्या स्वतःच्या मुलाने पर-स्त्रीचे अपहरण
केल्यावर त्यालासुद्धा त्यांनी गोळी घालून ठार केले.
अशा या बापूंची माहिती मिळाल्यावर ते
फरारी असताना कुख्यात चंदनतस्कर "वीरप्पन" ने
त्यांना बोलावून घेतले
आणि बापूंना त्याच्या टोळीत सामील होण्यास
सांगितले, यावर बापू गरजले.. "तू एक तस्कर आहेस
पैशासाठी तू जनावरे मारून तस्करी करतोस
आणि मी सर्व-सामान्यांसाठी हाती शस्त्र घेतले
आहे. आपले मार्ग वेगवेगळे आहेत."
बापूंच्या या स्वाभिमानाला वीरप्पन ने
सुद्धा मुजरा केला. अन्यायाविरुध्द लढताना बापू
पोलिसांपासून पळतच राहिले आणि कृष्णा-खोरे
दहशतीच्या विळख्यातून मुक्त केल्यावर एके
दिवशी आपल्या लढयाला पूर्णविराम देऊन
बापूंनी पोलिसांसमोर बिनशर्थ शरणागती पत्करली.
भारतीय घटनेनुसार बापुंच्यावर कित्येक
खुनांच्या मालिकेचे गुन्हे दाखल झाले
आणि त्यांना 'जन्मठेपेची' शिक्षा सुनावली.
तो क्रांतीचा धगधगणारा यज्ञकुंड थांबला.
कायद्याने दिलेली शिक्षा भोगून 'बापू बिरू'
नावाचा हा "क्रांतीसूर्य"
काही वर्षापूर्वी गावी परतला आहे. बापू
आता उर्वरित आयुष्य भजन, कीर्तन आणि प्रवचनात
व्यथित करत आहेत. "आपण कधीही कुणावर अन्याय
करायचा नाही, पण अन्याय
करणारयाला कधीही सोडायचं नाही." हे
ब्रीदवाक्य आयुष्यभर जपलेले 'बापू' आज तंबाखू, सिगारेट
दारू अशा व्यसनांच्या आहारी जाऊन
भरकटणारी तरूण
पिढी वाचविण्यासाठी गावोगावी प्रवचने करतात.
आजही "बापू बिरू वाटेगावकर" हे नाव कृष्णा खोरयात
घेतले तर आजकालच्या गुंडांचे अंग थरथर कापू लागते.
संपूर्ण कृष्णाकाठ शहारतो. एक पैलवान मनात आणले तर काय
करू शकतो त्याचे उदाहरण म्हणजे बापू होय.
आजही बोरगावच्या यात्रेत बापू बिरू स्वतः हजर
असतात. चांगली कुस्ती करणारया पोराला ते
बक्षीस देतात, त्याच्या रूपाने ते
स्वतःच्या पैलवानकीचे दिवस आठवतात. कधी बोरगाव
परिसरात आलात तर "बापू बिरू" उर्फ आमचे "आप्पा"
यांना जरूर भेटून दर्शन घेवून जा...

"बापु बिरू वाटेगांवकर"


EmoticonEmoticon