टीव्हीवाले साहेब आमच्या शेतकऱ्यांची शेतात पाणी भरण्याची नाईट पण दाखवा..

नक्की वाचा.....
टिव्हिवाले साहेब तुम्हाला दाखवायच ते दाखवा...
पण पठारभागाच रडगाणं
टीव्ही वरती दाखवा

जपान दाखवा,जर्मनी दाखवा
ब्राझील अन इटली दाखवा
पण
भाव नसलेली आमची दुधाची किटली पण दाखवा..

मोदी दाखवा, कोट दाखवा
रिज़र्व बँकेच्या नोट दाखवा
पण
उपाशी आमच्या जनावराचे
साहेब फक्त पोट दाखवा...

सिनेमा दाखवा, नाटक दाखवा
हाउस फुल अशी थिएटर दाखवा
पण
गरीब आमच्या शेतकऱ्यांची
उगळलेली खेटर दाखवा...

नेते दाखवा ,खादी दाखवा
नेत्यांसोबतची मादी दाखवा
पण
बैला विना पडलेली
चाबकाची वाधी दाखवा...

डान्स दाखवा ,नाच दाखवा
ठेक्या वरच्या लावण्या दाखवा,
पण
तरमळलेल्या जनावरांना
नसलेल्या छावन्या दाखवा...

रामायण दाखवा,
महाभारत दाखवा
बायबल अन् कुरान दाखवा
पण
पाण्या विना पेटलेल
पठार भागाच सरान दाखवा..

टिव्हिवाले साहेब तुम्हाला दाखवायचे ते दाखवा...
पिश्चरची फाईट दाखवा !!! .साहेबांची ऐट दाखवा .
पण
टीव्हीवाले साहेब आमच्या शेतकऱ्यांची शेतात पाणी भरण्याची नाईट पण दाखवा..

...🙏​🙏​

Related Posts


EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng
:lv