विचार करा..???????????????

विचार करा..???????????????

 एक मुलगा बापाला प्रश्न करतो..
मुलगा: - बाबा मला शाळेत शिकवतात की माणूस अगोदर आदिमानव होता. हे खरे आहे काय ?
बाप: - हो बेटा ,पूर्वी माणसे आदिमानव होते.

मुलगा: -मग ते अंगावर कपड़े का घालत नसत.?
बाप: - नाही बाळ ,माणसांच्या जीवनात हळु -हळु प्रगती झाली. माणसाला थोडे थोडे कळु लागले तेंव्हा तो अगोदर झाडाच्या पानांचे कपड़े घालू लागला...
मग त्याला जसे जसे कळु लागले तसे तो सूधारत गेला अनेक शोध
लावत गेला. आत्ता जेव्हढे काय आपण पहातो, वापरतो, ते सगळ
माणसांनीच निर्माण केले आहे.

मुलगा: - बाबा मग देव अगोदर होते की माणसे .?
बाबा: - बाळा देव आगोदर होते. देवानेच सृष्टि निर्माण
केलीये..

मुलगा: - मग बाबा असे कसे काय हो. त्या देवांच्या फोटोत तर कपड़े ,
दागिने ,त्रिशूल, सोने ,भाले ,गदा, पैसे, लाडू ,मोदक असे अनेक काय -
काय दिसते.? त्या वेळेस दागिने तयार करायला सोनार होता का ?
कपड्यांच्या मिल होत्या का ? कपड़े शिवायला टेलर होता का ?
भले ,त्रिशूल ,गधे ,तलवारी बनवणारे कारीगर होते काय ?
लाडू मोदक बनवनारे हलवाई होते कां ?

बाप:- मूर्खा सारखे प्रश्न विचारू नकोस, गप्प बस !
अरे बाळा, ते देव होते. ते काहीही करू शकतात..

मुलगा: - मग आता देव कुठे आहेत बाबा ?
बाप: - अरे देव आपल्याच आजुबाजूला आहेत.

मुलगा:- काय ? देव आहे इथे ?
बाप: - हो बाळा.
मुलगा: - मग त्यांना सांगा ना आपल्या देशातला भ्रष्टाचार मिटवायला,
शेतकर्यांच्या समस्या सोडवायला , त्यांची आत्महत्या थांबवायला, 2 वर्षाच्या लहान मुली पासुन 60 वर्षाच्या बाई पर्यंत बलात्कार रोज होतायत. ते थांबवायला.
तसेच देवालयातच्को ट्यावधी रुपये साठलेत, ते लोककल्याणा करिता
द्यायची बुद्धि त्या मंदिर प्रशासनाला द्यायला सांगा ना बाबा...

बाबा: - बाळा मी तुला हात जोड्तो, बस्स कर तूझे प्रश्न.
मलाच अजुन कळले नाही. तर मी तूला काय उत्तर देऊ.?
 मला लहानपणापासून जसा देव दाखविला जसा धर्म शिकविला तसाच मी पूजत आणि पाळत आलोय..
मला तुझे हे सगळे कळते रे.. पण सगळं पाळावं लागतं बाबा.. पटत
नसलं तरी गप्प बसावं लागतं..

मुलगा: -- म्हणजे तुम्ही आजपर्यंत तुमच्या बुद्धिचा आणि धैर्याचा वापरच केला नाही. पण बाबा मी तसे करणार नाही. सत्य-असत्य जाणुनच पूढे जाणार. मला एक खात्री तर पक्की आहे. - या सृष्टीचा निर्माता जसा
असेल ते असेल, पण सगळे धर्म आज शिकवताहेत तसा तर तो बिलकुल नाहीये...

हे ऐकुंन बापाची मान खाली गेली मुलाची नजर चुकवू लागले.

# आज कमी प्रमाणात असेल, पण कधी ना कधी पुढील पिढीतील मुले असे प्रश्न तुम्हांला नक्की विचारतील हे लक्षात ठेवा..
मग तेंव्हा मान खाली घालण्यापेक्षा आत्ताच चुक सुधारुन घ्या.

सगळे करताहेत म्हणून करू नका, कार्यकारण पटले तरच कोणतीही गोष्ट करा..
स्वतःला प्रश्न विचारा..

पुढची विज्ञाननिष्ठ पिढी ही देशासाठी तयार करा.. देवासाठी नको..!!

कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा पुरूष विधूर का होतात...???   ,

पत्रिका कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का  होतात, तर काही अकाली मृत्यू होतात असे का..???? 

95% विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा...????
  
मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणा-या सर्व उमेद्वारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात.असे का घडते.....????

मंत्रीपद मिळाल्यानंतर  मंत्रालयाची  जबाबदारी स्वीकारण्यासाठी  खुर्चीवर बसण्यासाठी  शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात...????
 मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते...???

शुभ मुहूर्तावर  मूल जन्माला घातल्यास  वैज्ञानिकराष्ट्रपतीपंतप्रधान  होईल काय..??? 

अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेली  व्यक्ती ....ती पण ..अंबानीसारखी  झाली का...???

उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर  , उद्योजक, आपल्या कार्यालयाचे  बांधकाम करतांनाव्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात.....तरी सुद्धा  कित्येकांना अपयश येते असे का...????

         -:  कारण :-

   👉... शुभमुहूर्त  हे थोतांड आहे सत्य नव्हे...
 ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो ,तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.

  👉...मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली ...आणि कधीही मुहूर्त पाहणारी .....ब्रिटिशशाही अख्खा  भारत देश गिळून बसली.
     👏👏..बांधवांनो ...🙏🙏

☀👉 ...स्वतःवर स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा.

👉 जर कोणता पंडित, ज्योतिषी, बुवा, बापू, कापु, झापु महाराज,साधू ,साध्वी तथा वास्तूशास्त्र विशारद शुभमुहूर्तावरच सर्व काही केल्यास तथा वास्तूशास्त्राप्रमाणेच बांधकाम केल्यास यश येईल असे सांगत असतील तर..... स्टँम्प पेपरवर लिहून देण्यास सांगा.
...यश आल्यास नुकसानभरपाईचा दावा ठोकेल  असे सांगा . ते तुमच्या जवळही फिरकणार नाहित.
....कारण त्यांनाही माहित असते हे सर्व थोतांड आहे.

💐  " जर तुमचं  मन साफ असेल   तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता असेल....तर तुमच्यासाठी कोणतीही  वेळ  ही  ' शुभ मुहूर्तच ' असते ".


🙏👏 विचार करा..???????????????👏🙏