Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Showing posts with label मराठी कविता. Show all posts
आई

आई

आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.
आई म्हणायची संध्याकाळची, 
झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात,
होत नाहीत पुढे.
आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.
आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही वाटत नाही,
खरं बोलायचं भय.
आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.
आई म्हणायची निर्मळ मन तर 
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.
आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.
आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग,
लावायची कोणाला लागली लाथ तर,
पाया पडायला भाग.
दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.
आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.
आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवते सगळं,
जरी आता सगळं माझ्या हातात!
आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड व्हायच्या पापण्या अन
मिटायचे डोळे आपोआप.
अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.
जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ 
वाटून खायचे सात.
आई म्हणायची,......

खूप छान ग्रामीण कविता आहे ,

खूप छान ग्रामीण कविता आहे , 



काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता ,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।
कशी ऊन्हात , ऊन्हात तळतात माणसं ।
कशी मातीत , मातीत मळतात माणसं ।
कशी खातात जिवाला खस्ता ,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।1।।

काळ्या बापाचं , बापाचं हिरवं रानं ।
काळ्या माईनं , माईनं पिकवलं सोनं ।
पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता ।।
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।2।।

ईथं डब्यात तुला साखर लागतीया गोड ।
तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड ।
पण भाव ठरतो त्याला न पुसता ।
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।3।।

जवा दुष्काळ , दुष्काळ घिरट्या घाली ।
तवा गावाला , गावाला कुणी न वाली ।
कसं सुगीत घालतात गस्ता ,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।4।।

या भुमिचा , भुमिचा मुळाधिकारी ।
बाप झालाय , झालाय आज भिकारी ।
गाव असुन झालाय फिरस्ता ,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।5।।

काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता ,
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ।।।।।

हि कविता माझ्या शेतकरी दादासाठी पुढे पाठवा

फक्त हिमतीने लढ

फक्त हिमतीने लढ


👍👍👍🙏👌👌👌
घरटे उडते वादळात
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? 
म्हणून आत्महत्या करते ?
प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही
घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?
हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?
कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?
घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा
राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?
कास्तकाराची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे
कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत
मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही
घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग
काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?
निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय
निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ
👊
🌺🌷 आवडली तर ईतरांनाही Share करा

🌺"साद आईची"🌺


महिनेमागून महिने,
शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते
भिजून जातो पदर ,
अन मन रिते राहाते
कधी मधी मात्र ,
तुझी मनीऑर्डर येते
पैसे नकोत यावेळी ,
तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा

तुझा बा होता तोवर ,
काळ बरा गेला
तुझी आठवण काढत ,
उघड्या डोळ्यांनी गेला
शेवटपर्यंत सांगत होता,
लेक माझा भला
तू मोठा साहेब,
त्याचं मोठं कौतुक त्याला
माझ्याही ह्रदयात फोटो,
तुझा तू पाहून जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा.

दुष्काळाच्या साली ,
जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला
वर्षाकाठी एक कपडा,
पुरवून-पुरवून घातला
सालं घातली बापाने,
पण तुला शाळेमधी घातला
हवं तर तू हे ,
सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.

धुणी-भांडी करीन मी,
केरकचरा भरीन मी
पुरणपोळ्या, अळुवड्या ,
तुझ्यासाठी रांधीन मी
नातवंडांचं दुखलं-खुपलं ,
सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार नाही मी
तुझ्या घरची कामवाली ,
म्हणून घेऊन जा
पण बाळा मला
तुझ्या घरी घेऊन जा.

थकले रे डोळे बाळा,
प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे
आता मुश्किल झाले
विसरु कशी तुला मी,
तुझ्यामुुळे आई झाले
बाळ माझं 'कुलभूषण'
पोरकी मी का झाले?
आता माझ्या थडग्यापाशी
'आई' म्हणून जा
जमलंच तुला तर
हा वृध्दाश्रम पाडून जा.

"आयुष्य"


जीवन आहे एक रम्य पहाट,
संकटांनी गजबजलेली
एक वादळवाट

सोनेरी क्षणांची एक आठवण,
सुख दुःखाची गोड साठवण,

प्रेमाच्या पाझरांची वाहती
एक सरीता,
नात्यांच्या अतुट शब्दांनी
गुंफलेली कविता,

जाणिवेच्या पलीकडचं
जगावेगळ गाव,

यालाच तर आहे "आयुष्य" हे नाव.............
शब्दशिल्प

शब्दशिल्प


              

              
कुणी चांगले म्हणावे म्हणून
              काम करू नका ,
             आपण करीत असलेल्या कामाने
             अनेकांचे भले होणार असल्यास
              ते काम सोडूच नका.
     
                             जर आपला हेतुच शुध्द आणि
                             प्रामाणिक असेल तर...
                             आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या
                              टीकेला काहीच महत्व नसते.

               चांगल्या कर्मांची फळे
               चांगलीच असतात.

                             मुखातून गेलेला राम आणि
                   निस्वार्थापणे केलेले काम
                          कधीही व्यर्थ  जात नाहीत."