जीवन आहे एक रम्य पहाट,
संकटांनी गजबजलेली
एक वादळवाट
सोनेरी क्षणांची एक आठवण,
सुख दुःखाची गोड साठवण,
प्रेमाच्या पाझरांची वाहती
एक सरीता,
नात्यांच्या अतुट शब्दांनी
गुंफलेली कविता,
जाणिवेच्या पलीकडचं
जगावेगळ गाव,
यालाच तर आहे "आयुष्य" हे नाव.............
Related Posts :